सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार मा. श्री. आदित्य ठाकरे ह्यांची जाहीर सभा पुसेगाव येथे होणार आहे.
या सभेला प्रमुख उपस्थिती माननीय जयंत पाटील साहेब यांची असेल. या सभांचे नियोजन करण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
ही सभा आज ३० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता सुरु होईल.