शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा

महाराष्ट्राच्या माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधील समाधीचे दर्शन घेऊन शशिकांत शिंदे यांनी आपला प्रचार कार्याला सुरूवात केली. मुंबई बाजार समितीत चुकीचे काम झाल्याचे कारण पुढे करून जर कोणी माझ्याविरुद्ध दबावाचे राजकारण करीत असेल तर परिणामांना मी कधीच घाबरलो नाही, खोट्या गुन्ह्यातून आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास सत्य कधीच लपत नसते असा ठाम विश्वास दाखवत, विरोधकांनी (खासदार उदयनराजे भोसले) अशा प्रकारे चुकीचा डाव खेळू नये अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार, आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

प्रचार सुरू

यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधील समाधीस्थळी जाऊन शशिकांत शिंदे यांनी आपला प्रचार कार्य सुरू केले. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. उदयसिंह पाटील – उंडाळकर, सारंग पाटील, दीपक पवार, आणि इतर नेते व कार्यकर्त्यांची भरपूर उपस्थिती होती. त्यांच्यासोबत पत्रकारांनी चर्चा केली. ‘रामकृष्ण हरी, वाजली तुतारी’, ‘शरदचंद्र पवार, खासदार शशिकांत शिंदे यांचा विजय असो’ अशी घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

खासदार उदयनराजेंच्या इशाऱ्यावर टीका

मुंबई बाजार समितीत ज्यांनी चुकीचे काम केले ते कायद्यापेक्षा मोठे नसून, याचे त्यांनी स्वतःचे निरीक्षण करूनच लोकांपुढे गेले पाहिजे असा इशारा खासदार उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंचा नाव न घेता केला होता. यासंदर्भात छेडले असता शिंदे म्हणाले, लोकसभेची संपूर्ण निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याने कोणाचेही काहीही चालणार नाही आणि साताऱ्याच्या भूमीने कधीही जातीयरंग असलेल्या लोकांना थारा दिलेला नाही. आम्ही निष्ठा बदलली नाही आणि त्यातून होणाऱ्या परिणामांनाही घाबरत नाही. चुकीच्या गुन्ह्यातून आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास सत्य कधीच लपत नसून, न्यायप्रविष्ट प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करायची गरज नाही. आम्ही लोकांच्या न्यायालयमध्ये असून, निवडणुकीत कोणी असा दबाव आणत असल्यास ते योग्य नाही. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी जर पाच टप्प्यात निवडणूक होत असेल तर ‘महायुती’ला पोषक वातावरण नाही. राज्यकर्त्यांविरोधात सर्वत्र लाट असल्याची टीका शिंदे यांनी केली.

माझी लढाई

मी कोणाला आव्हान देत नाही. माझी लढाई कोणत्या उमेदवाराशी वा नावाशी नाही. नेत्यांना, पक्षांना फोडून सातारा जिल्ह्यातील काबीज करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. पण, त्यावर जनतेचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले

शरद पवारचे सच्चे नेते

शरद पवार हे पंतप्रधान झाले असते मात्र, ज्यावेळी काँग्रेसमधून ते बाहेर पडले तेंव्हा एच. डी. देवेगौडांनी त्यांना बोलावलं होतं पण, पवारांनी ऐनवेळी कच खाल्ली अशी टीका प्रफुल्ल पटेल यांनी केल्याकडे लक्ष वेधले असता, शिंदे म्हणाले, पवारसाहेब कच खाणारे नव्हेतर डाव टाकणारे कणखर नेते आहेत. आताही त्यांनी महाराष्ट्राच्या अस्सल स्वाभिमानाचा डाव टाकला आहे त्यातून, ‘महायुती’चे स्वप्न भंग पावणार असून, निवडणूक निकालातून हे दिसून येईल असा विश्वास शिंदेंनी दिला.

माथाडी कामगारांशी नाते

माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील भाजपात असताना, परंतु, माथाडी कामगारांना नेहमीच शरद पवारांशी बांधिलकी राहिली आहे. माझेही त्यांसाठी काम असताना माथाडी कामगार ‘महाविकास आघाडी’च्या मध्ये उभा राहतात.असा ठाम विश्वास आहे असे शिंदे यांनी सांगितले.

दिवंगत नेत्यांच्या पुतळ्याला अभिवादन

शशिकांत शिंदे यांनी सगळ्यात प्रथम  काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या निवासस्थानी जाऊन पृथ्वीराज चव्हाणांचे पिताश्री, माजी केंद्रीय मंत्री डी. आर. तथा आनंदराव चव्हाण आणि काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रेमालकाकी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आमदार व माजी मंत्री बाळसाहेब पाटील यांच्यासह नेते मंडळींच्या उपस्थितीत शिंदेंनी ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या प्रतिमचे दर्शन घेवून अभिवादन केले. कराड शहरातील सगळ्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.

हे हि वाचा:महाविकास आघाडीच्या उमेदवारावर टांगती तलवार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top