Voter ID:
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. जर तुमचं मतदान ओळखपत्र (Voter ID) गहाळ झालं असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. निवडणूक आयोगाने मतदानासाठी 12 पर्यायांची सोय केली आहे.
ही ओळखपत्रे ग्राह्य धरली जातील:
- आधार कार्ड
- वाहन चालक परवाना
- पॅन कार्ड
- भारतीय पारपत्र (पासपोर्ट)
- मनरेगा जॉब कार्ड
- टपाल खात्याचे पासबुक
- निवृत्ती वेतन कागदपत्र
- सरकारी कर्मचारी सेवा ओळखपत्र
- खासदार/आमदार ओळखपत्र
- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे स्मार्ट कार्ड
- दिव्यांग ओळखपत्र
- आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
महत्त्वाचे:
- मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी आहे.
- मतदान करताना गोपनियता राखा, नियमांचे उल्लंघन टाळा.
- कोणतेही ओळखपत्र मूळ स्वरूपात नेणे अनिवार्य आहे; मोबाईलमधील डिजिटल कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत.
तुमच्या हक्काचा मतदानाचा उपयोग करून राष्ट्रीय कर्तव्य निभवा आणि नियमांचे पालन करून निवडणुकीचा भाग बना! 🗳️