भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीच्या मालकीच्या बंगळुरुमधील One8 Commune रेस्टॉरंट आणि पबवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली असून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बंगळुरुमध्ये रात्री दीड वाजेपर्यंत उशिरा पब चालू ठेवल्याच्या कारणावरून 3-4 पबवर कारवाई करण्यात आली, त्यात विराट कोहलीच्या One8 Commune चा समावेश आहे. मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात असल्याच्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली.
कब्बन पार्क पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार, कस्तुरबा रोडवर स्थित One8 Commune 6 जुलै रोजी रात्री 1.20 वाजता अजूनही चालू होता. गस्त घालत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला One8 Commune रात्री उशिरापर्यंत उघडा असल्याची माहिती मिळाली. पहाटे 1:20 वाजता पबमध्ये पोहोचल्यावर उपनिरीक्षकांनी पाहिले की पब अजूनही ग्राहकांना सेवा देत होता, त्यामुळे तातडीने कारवाई करण्यात आली.
विराट कोहलीची संपत्ती:
मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीची एकूण संपत्ती सुमारे 1050 कोटी आहे. त्याला बीसीसीआयकडून A+ वार्षिक करारानुसार वेतन मिळते आणि आयपीएलमधून 16 कोटींची कमाई होते. जाहिरातीतूनही तो चांगली कमाई करतो. विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा मुंबईतील 34 कोटींच्या बंगल्यात राहतात. गुरुग्राममध्येही त्यांची 100 कोटींची संपत्ती आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कायमचे लंडनला शिफ्ट झाल्याचा दावा;
विराट-अनुष्काने लंडनमध्ये घर घेतले?
रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी लंडनमध्ये घर घेतले आहे. कोहलीने अलीबागमध्ये 10 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता आणि आता लंडनमध्ये घर असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. अनुष्का बऱ्याच दिवसांपासून लंडनमध्ये आहे, आणि अकायचा जन्मही तिथेच झाल्याचे म्हणले जाते. अकायच्या जन्मामुळे कोहलीने टीम इंडियातून ब्रेक घेतला होता. अनुष्का गेल्या अनेक महिन्यांपासून लंडनमध्ये राहत असल्याचीही माहिती आहे.