शिंदे विरुद्ध ठाकरे:
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. राज्यभरातील सर्व 288 जागांवर मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उमेदवार 52 मतदारसंघांमध्ये थेट समोरासमोर लढणार आहेत. या 52 मतदारसंघांमध्ये दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
याआधी लोकसभा निवडणुकीत, ठाकरे गटाच्या शिवसेनेला 9 जागांवर विजय मिळाला होता, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 7 जागांवर यश आले होते. मात्र, या वेळेस परिस्थिती थोडी वेगळी आहे, कारण महायुती सरकारने महत्त्वकांक्षी योजनांची घोषणा केली आहे, ज्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात टफ फाईट होईल.
ठाकरे विरुद्ध शिंदे – 52 मतदारसंघात थेट लढत
- चोपडा – राजू तडवी (ठाकरे गट) विरुद्ध चंद्रकांत सोनावणे (शिंदे गट)
- पाचोरा – वैळाली सूर्यवंशी (ठाकरे गट) विरुद्ध किशोर पाटील (शिंदे गट)
- बुलढाणा – जयश्री शेळके (ठाकरे गट) विरुद्ध संजय गायकवाड (शिंदे गट)
- मेहकर – सिद्धार्थ खरात (ठाकरे गट) विरुद्ध डॉ. संजय रायमुलकर (शिंदे गट)
- बाळापूर – नितीन देशमुख (ठाकरे गट) विरुद्ध बळीराम शिरसकर (शिंदे गट)
- दर्यापूर – गजानन लवटे (ठाकरे गट) विरुद्ध अभिजीत अडसूळ (शिंदे गट)
- रामटेक – बिशाल बरबटे (ठाकरे गट) विरुद्ध आशिष जैस्वाल (शिंदे गट)
- दिग्रस – पवन जयस्वाल (ठाकरे गट) विरुद्ध संजय राठोड (शिंदे गट)
- कळमनूरी – संतोष टारफे (ठाकरे गट) विरुद्ध संतोष बांगर (शिंदे गट)
- परभणी – डॉ. राहुल पाटील (ठाकरे गट) विरुद्ध आनंद भरोसे (शिंदे गट)
- सिल्लोड – सुरेश बनकर (ठाकरे गट) विरुद्ध अब्दुल सत्तार (शिंदे गट)
- कन्नड – उदयसिंग राजपूत (ठाकरे गट) विरुद्ध संजना जाधव (शिंदे गट)
- औरंगाबाद मध्य – बाळासाहेब थोरात (ठाकरे गट) विरुद्ध प्रदीप जैस्वाल (शिंदे गट)
- औरंगाबाद पश्चिम – राजू शिंदे (ठाकरे गट) विरुद्ध संजय शिरसाट (शिंदे गट)
- पैठण – दत्ता गोर्डे (ठाकरे गट) विरुद्ध विलास भुमरे (शिंदे गट)
- वैजापूर – दिनेश परदेशी (ठाकरे गट) विरुद्ध रमेश बोरनारे (शिंदे गट)
- नांदगाव – गणेश धात्रक (ठाकरे गट) विरुद्ध सुहास कांदे (शिंदे गट)
- मालेगाव बाह्य – अद्वय हिरे (ठाकरे गट) विरुद्ध दादा भुसे (शिंदे गट)
- पालघर – जयेंद्र दुबळा (ठाकरे गट) विरुद्ध राजेंद्र गावीत (शिंदे गट)
- बोईसर – डॉ. विश्वास वळवी (ठाकरे गट) विरुद्ध विलास तरे (शिंदे गट)
- भिवंडी ग्रामीण – महादेव घाटाळ (ठाकरे गट) विरुद्ध शांताराम मोरे (शिंदे गट)
- कल्याण पश्चिम – सचिन बासरे (ठाकरे गट) विरुद्ध विश्वनाथ भोईर (शिंदे गट)
- अंबरनाथ – राजेश वानखेडे (ठाकरे गट) विरुद्ध बालाजी किणीकर (शिंदे गट)
- कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर (ठाकरे गट) विरुद्ध राजेश मोरे (शिंदे गट) विरुद्ध मनसेचे उमेदवार राजू पाटील
- ओवळा माजीवाडा – नरेश मनेरा (ठाकरे गट) विरुद्ध प्रताप सरनाईक (शिंदे गट)
- कोपरी पाचपाखडी – केदार दिघे (ठाकरे गट) विरुद्ध एकनाथ शिंदे (शिंदे गट)
- मागाठाणे – उदेश पाटेकर (ठाकरे गट) विरुद्ध प्रकाश सुर्वे (शिंदे गट)
- विक्रोळी – सुनील राऊत (ठाकरे गट) विरुद्ध सुवर्णा करंजे (शिंदे गट)
- भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर (ठाकरे गट) विरुद्ध अशोक पाटील (शिंदे गट)
- जोगेश्वरी पूर्वी – अनंत (बाळा) नर (ठाकरे गट) विरुद्ध मनीषा वायकर (शिंदे गट)
- दिंडोशी – सुनील प्रभू (ठाकरे गट) विरुद्ध संजय निरुपम (शिंदे गट)
- अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके (ठाकरे गट) विरुद्ध मुरजी पटेल (शिंदे गट)
- चेंबूर – प्रकाश फातर्पेकर (ठाकरे गट) विरुद्ध तुकाराम काते (शिंदे गट)
- कुर्ला – प्रविणा मोरजकर (ठाकरे गट) विरुद्ध मंगेश कुडाळकर (शिंदे गट)
- माहीम – महेश सावंत (ठाकरे गट) विरुद्ध सदा सरवणकर (शिंदे गट) विरुद्ध अमित ठाकरे (मनसे) – तिरंगी लढत
- वरळी – आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा
- भायखळा – मनोज जामसुतकर (ठाकरे गट) विरुद्ध यामिनी जाधव (शिंदे गट)
- कर्जत – नितीन सावंत (ठाकरे गट) विरुद्ध महेंद्र थोरवे (शिंदे गट)
- महाड – स्नेहल जगताप (ठाकरे गट) विरुद्ध भरत गोगावले (शिंदे गट)
- नेवासा – शंकरराव गडाख (ठाकरे गट) विरुद्ध विठ्ठलराव लंघे पाटील (शिंदे गट)
- उमरगा – प्रवीण स्वामी (ठाकरे गट) ज्ञानराज चौगुले (शिंदे गट)
- उस्मानाबाद – कैलास पाटील (ठाकरे गट) विरुद्ध अजित पिंगळे (शिंदे गट)
- बार्शी – दिलीप सोपल (ठाकरे गट) विरुद्ध राजेंद्र राऊत (शिंदे गट)
- सांगोला – दीपक आबा साळुंखे (ठाकरे गट) विरुद्ध शहाजीबापू पाटील (शिंदे गट)
- पाटण – हर्षद कदम (ठाकरे गट) विरुद्ध शंभूराज देसाई (शिंदे गट)
- दापोली – संजय कदम (ठाकरे गट) योगेश कदम (शिंदे गट)
- गुहागर – भास्कर जाधव (ठाकरे गट) विरुद्ध राजेश बेंडल (शिंदे गट)
- रत्नागिरी – बाळ माने (ठाकरे गट) विरुद्ध उदय सामंत (शिंदे गट)
- राजापूर – राजन साळवी (ठाकरे गट) विरुद्ध किरण सामंत (शिंदे गट)
- कुडाळ – वैभव नाईक (ठाकरे गट) विरुद्ध निलेश राणे (शिंदे गट)
- सावंतवाडी – राजेश तेली (ठाकरे गट) विरुद्ध दीपक केसरकर
- राधानगरी – के. पी. पाटील (ठाकरे गट) विरुद्ध प्रकाश आबिटकर (शिंदे गट)
शिंदे गटाच्या बंडानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. याआधीच लोकसभा निवडणुकीत दोन्ही गटांमध्ये चांगली स्पर्धा पाहायला मिळाली होती. आता, महायुती सरकारच्या योजनांनी परिस्थितीला नवीन वळण दिलं आहे, ज्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे या लढतीत थरार आणि सस्पेन्स आहे.
Nitin Gadkari New Project: मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार !