खासदार संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगड या दोन्ही तालुक्यात जबरदस्त स्पर्धा लावली आहे. लीड देणाऱ्या तालुक्याला ते 5 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. ज्या तालुक्यातून मंडलिक यांना जास्त लीड त्या तालुक्याला धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्या निधीतील अडीच अडीच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्याची शर्यतच लागली आहे.
भाजपचे खासदार धनंजय महाडिकांची मतदारांना अनोखी ऑफर
लोकसभा निवडणुका अवघ्या कमी दिवसांवर असल्याने सर्वच राजकीय पक्ष जोरदार आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला लागले आहे. विविध राजकीय पक्षाकडून उमेदवार निवडून आणण्यासाठी विविध प्रयत्न, युक्त्या केले जात आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार संजय मंडलिक हे लोकसभा लढवणार आहेत. मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडणून आणण्यासाठी भाजपने कंबरच कसली आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी मतदारांना अनोखी ऑफर दिली आहे. धनंजय महाडिक म्हणाले, संजय मंडलिक यांना लीड द्या आणि ५ कोटींचा निधी मिळावा, अशीच ऑफरच त्यांनी मतदारांना दिली आहे. दरम्यान, धनंजय महाडिक यांनी दिलेल्या ऑफरची महाराष्ट्रामध्ये चांगलीच चर्चा होताना दिसतेय. ‘मी तुम्हाला आव्हान करतो, कागल तालुक्यापेक्षा तुम्ही जास्त लीड दिले तर पाच कोटी रुपयांचा अधिक निधी देईल. आता शर्यत लागली मतदारांनो लागा तयारीला.यामध्ये आम्ही दोघे आहोत, नाहीतर तुम्ही मला एकट्याला धराल, असेही धनंजय महाडिक म्हणाले.