नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) ने 2024 साठी 336 Non-Executive पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. विविध विभागांतील रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया 9 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी नोव्हेंबर 8, 2024 ही अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना NFL च्या अधिकृत संकेतस्थळाला careers.nfl.co.in किंवा nationalfertilizers.com वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
भरती तपशील:
- कंपनीचे नाव: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL)
- एकूण पदसंख्या: 336
- पद प्रकार: Non-Executive
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 9 ऑक्टोबर 2024
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 8 नोव्हेंबर 2024
उपलब्ध पदे:
या भरतीमध्ये स्टोअर असिस्टंट, नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, अकाउंट असिस्टंट, अटेंडंट ग्रेड-I, आणि ज्युनिअर इंजिनिअर या पदांसह विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या योग्यतेनुसार या पदांसाठी अर्ज करावा.
पात्रता आणि अटी:
- वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे.
- शैक्षणिक पात्रता: संबंधित पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आवश्यक आहे. उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेल्या तपशीलानुसार आवश्यक शैक्षणिक अटी तपासून अर्ज करावा.
अर्ज पद्धती:
- वेबसाईटवर जा: अधिकृत NFL संकेतस्थळावर लॉगिन करा.
- अर्ज फॉर्म भरा: आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फी भरावी: अर्ज शुल्क भरून अर्ज अंतिमरूपात सबमिट करा.
निवड प्रक्रिया:
NFL ने तीन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया ठेवली आहे:
- लेखी परीक्षा: उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षेला सामोरे जावे लागेल.
- दस्तऐवज पडताळणी: पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील.
- वैद्यकीय चाचणी: अंतिम निवडीसाठी उमेदवारांनी वैद्यकीय चाचणी पात्र करावी लागेल.
NFL च्या या भरती प्रक्रियेमुळे विविध विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
हे देखील वाचा : IIBF मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती; अर्ज करण्यासाठी उमेदवारांची गर्दी