24×7 Marathi

September 9, 2024

आजची सर्वात मोठी बातमी… नरेंद्र मोदी आज राजीनामा देणार?

लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल हाती आले असून जनतेने कौल दिला आहे. भाजपाप्रणित एनडीने बहुमतासाठी आवश्य असलेल्या 272 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. पण भाजपला स्वबळावर बहुमतापेक्षा अधिक जागा मिळवता आलेल्या नाहीत. 2014 आणि 2019 साली भाजपने अनुक्रमे 282 आणि 303 जागा मिळवल्या होत्या. मात्र यावेळी निकाल वेगळा लागला आहे.

लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल हाती आले असून जनतेने कौल दिला आहे. भाजपाप्रणित एनडीने बहुमतासाठी आवश्य असलेल्या 272 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. पण भाजपला स्वबळावर बहुमतापेक्षा अधिक जागा मिळवता आलेल्या नाहीत. 2014 आणि 2019 साली भाजपने अनुक्रमे 282 आणि 303 जागा मिळवल्या होत्या. मात्र यावेळी निकाल वेगळा लागला आहे . याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत घडामोडीना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कॅबिनेट बैठक बोलवली असून आजच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

औपचारिकता म्हणून हा राजीनामा देण्यात येईल, त्यानंतर पुढील निर्णय होईपर्यंत राष्ट्पती त्यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार पाहण्याची सूचना करू शकतात. या नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडी सत्तास्थापनेसाठी औपचारिक दावा करण्याची शक्यता आहे.

राजधानीत घडामोडींना वेग

दरम्यान आज राजधानी दिल्लीमध्ये आज दोन मोठ्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. इंडिया आघाडीची आज संध्याकाळी बैठक असून एनडीएची देखील आजच बैठक होणार आहे. या बैठकीसाठी बिहारमधील जनता दल युनायटेडचे नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशातील तेलगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. आज एनडीएच्या संयोजक पदावर चर्चा होणार असून आजच्या बैठकीत शपथविधीवर पण चर्चा होवू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इंडिया आघाडीची देखील आज संध्याकाळी बैठक होणार असून विरोधी पक्षात बसायच की, सरकार स्थापनेचा दावा करायचा? यासाठी रणनिती ठरु शकते. तसेच इंडिया आघाडीचा आज पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.

मोदींचा शपथविधी कधी ?

एनडीएला बहुमत मिळाल्याने देशभरात जल्लोष सुरू आहे. मात्र मागच्या दोन टर्मप्रमाणे यावेळी देशाने कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. पण भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 292 जागा जिंकल्या आहेत.तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने 234 जागांवर विजय मिळवला. मात्र सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला 272 ही मॅजिक फिगर एनडीएने पार केल्याने ते सत्तास्थापनेसाठी दावा करतील. दरम्यान मोदी सरकारच्या शपथविधीसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. येत्या 9 जूनला (रविवार) मोदी सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनाने काही महत्वाची पावलं उचलली आहे. त्यामुळे आजपासून 9 जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहे. शपथविधी झाल्यानंतरच राष्ट्रपती भवन खुले केले जाईल. येत्या 9 जूनला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top