24×7 Marathi

आज कोण जिंकणार मुंबई का चेन्नई ?

IPL 2024 चा 29 वा सामना रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. एमआय पाचपैकी दोन सामने जिंकून गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, सीएसकेने पाचपैकी दोन सामने गमावले असून ते तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 35 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्स 20 सामने जिंकून पुढे आहे. सुपर किंग्जने 16 सामने जिंकले आहेत.

मुंबई इंडियन्स वि चेन्नई सुपर किंग्ज पिच रिपोर्ट

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. इथे फलंदाजाला मदत मिळते. चेंडू बॅटवर चांगला येतो. मैदान लहान असल्यामुळे चौकार-षटकारांचा पाऊस पडतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. मुंबई इंडियन्सने गेल्या सामन्यात आरसीबीविरुद्ध अशीच कामगिरी केली होती. इशान किशनने 69 धावांची तर सूर्यकुमार यादवने 52 धावांची तुफानी खेळी केली. जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेतल्या होत्या. या मैदानावर आयपीएलचे 114 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ५१ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १७० आहे.

मुंबई इंडियन्स संभाव्य खेळाडू

रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल.
प्रभावशाली खेळाडू- सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वढेरा

चेन्नई सुपर किंग्ज संभाव्य खेळाडू

रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, मथिशा पाथीराना.
प्रभावशाली खेळाडू- शिवम दुबे, मोईन अली, शेख रशीद, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top