24×7 Marathi

September 9, 2024

दीर्घायुष्यासाठी जपानी जीवनशैलीचे रहस्य

जपान

जपान हा देश दीर्घायुष्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. तेथील लोकांचे आयुर्मान जगात सर्वाधिक आहे. वृद्धावस्थेत देखील निरोगी राहणाऱ्या आणि ताजेतवाने दिसणाऱ्या जपानी लोकांची जीवनशैलीच याचे रहस्य आहे. चला, त्यांच्या खास सवयींविषयी जाणून घेऊया.

आहार

जपानी लोक त्यांच्या आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखर खूप कमी प्रमाणात घेतात. ते ताज्या भाज्या, सीफूड, सोया उत्पादने आणि तांदूळ अधिक खातात. त्यांच्या आहारात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराच्या तणाव आणि सूज यांच्याशी लढतात. हे ताजे आणि नैसर्गिक अन्न त्यांच्या शरीराला निरोगी ठेवते आणि जीवनशक्ती वाढवते.

ग्रीन टी

ग्रीन टी हा जपानी संस्कृतीत महत्त्वाचा घटक आहे. यात कॅटेचिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे जुनाट आजारांचा धोका कमी करतात आणि पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. नियमित ग्रीन टी सेवन केल्याने त्वचेचे आरोग्य आणि एकूणच आरोग्य सुधारते. ग्रीन टी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो आणि इम्युनिटी वाढवतो.

पोर्शन मॅनेजमेंट आणि व्यायाम

जपानी लोक हारा हाची बुचे या तत्त्वाचे पालन करतात, ज्यात 80% पोट भरल्यानंतर जेवण थांबवले जाते. यामुळे लठ्ठपणा आणि अति खाणे टाळता येते. कमी प्रमाणात खाल्ल्याने पचनसंस्थेवर कमी दबाव येतो. तसेच, ते नियमित चालणे, सायकल चालवणे आणि ताई ची, मार्शल आर्ट्ससारख्या पारंपारिक एक्टीव्हीटीजमध्ये भाग घेतात. नियमित व्यायामामुळे स्नायू मजबूत होतात, हृदय निरोगी राहते आणि मानसिक आरोग्य सुधारते.

त्वचेची निगा

जपानी लोक त्यांच्या त्वचेची खूप काळजी घेतात. सन प्रोटेक्शन, हायड्रेशन आणि साफसफाई यावर भर देतात. नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वचा तरुण आणि निरोगी ठेवतात. नियमित त्वचेची काळजी घेतल्याने त्वचा ताजेतवाने राहते आणि वृद्धत्वाची चिन्हे उशिरा दिसतात. सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी ते सनस्क्रीनचा वापर करतात आणि त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी खूप पाणी पितात.

पाणी पिणे

पुरेशा प्रमाणात पाणी पिणे ही एक साधी पण प्रभावी अँटी-एजिंग सवय आहे. जपानी लोक त्यांच्या आहारात फळे आणि भाज्या यासारख्या हायड्रेटिंग पदार्थांचा समावेश करतात आणि दिवसभर वारंवार पाणी पितात. पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. पाणी पिण्याने शरीराची कार्यक्षमता वाढते आणि इम्युनिटी मजबूत राहते.

तणाव आणि सामाजिक संबंध

जपानी लोक तणावाचा सामना करण्यासाठी ध्यान करणे आणि निसर्गात वेळ घालवण्यासारख्या तंत्रांचा वापर करतात. तणाव वृद्धत्वाचे एक मुख्य कारण आहे. वुडलँड बाथिंग किंवा शिनरीन-योकू यांसारख्या सरावांमध्ये सहभागी होऊन तणाव कमी होतो. जपानी संस्कृतीत सामाजिक संबंध वाढवण्याला खूप महत्त्व आहे. दीर्घायुष्य आणि मानसिक आरोग्य हे नियमित सामाजिक संवाद आणि आपुलकीच्या भावनेशी जोडलेले आहे. त्यांच्या जीवनशैलीत तणाव कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत, ज्यामुळे ते मानसिकदृष्ट्या फ्रेश राहतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top