देशातील सगळ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लानच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढवल्या आहेत. जो कोणी रिचार्ज करायला जातो तेव्हा त्याच्या वाढलेल्या किंमती पाहून घाम फुटतो. या सगळ्यात BSNL कंपनीनं सर्वांना परडतील असे डेटा प्लान आणले आहेत. जास्त दिवसांची वॅलिडिटी आणि अनेक सुविधा देखील त्यांनी दिल्या आहेत.
BSNLचा नवा प्लान हा 987 रुपयांचा आहे जो 160 दिवस चालेल. म्हणजेच तुम्ही जर एकदा हा रिचार्ज केला तर तुम्हाला पुढचे पाच महिने रिचार्ज करण्याची गरज नाही. त्याचबरोबर कंपनीनं अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. डेटाची लिमिट संपल्यानंतर तो 40Kbps च्या स्पीडने चालेल. यात तुम्हाला कंपनीनं BSNL ट्यून फ्री दिली आहे ज्यामुळे तुम्ही कॉलरट्यूनचा आनंद घेऊ शकता. ग्राहकांना दररोज 100 SMS देखील मिळणार आहेत.
Airtel आणि Viच्या तुलनेत हा प्लान खूप स्वस्त आणि फायदेशीर असल्याचं दिसतंय. Airtel त्यांचा 1097 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वॅलिडिटीसह देत आहे, ज्यात ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो. फ्री कॉलिंग देखील मिळते. तर Vi कंपनी 979 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांची वॅलिडिटी देते, ज्यात ग्राहकांना 2GB डेटा दररोज वापरता येतो.
अमेझॉन प्राइम डे सेल 2024: अर्ध्या किंमतीत TV, मोबाईल आणि एसी वर शानदार ऑफर्स