24×7 Marathi

September 9, 2024

बॉलीवूड मध्ये सगळं काही प्रसिद्धीसाठी!

Norafathehi

नोराचा जन्म ठिकाण कॅनडा आहे. 2014 मध्ये ‘रोअर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमधील करिअरची सुरुवात केली. नोरा तिच्या डान्ससाठी विशेष ओळखली जाते.
अभिनेत्री नोरा फतेही अनेकदा तिच्या डान्स आणि लूकमुळे चर्चेत असते. तिचा डान्स लोकांना खूप आवडतो. नोरा फतेही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चित्रपटसृष्टीत तिला झालेल्या वाईट वागणुकीबद्दल तिने बोलले आहे. हे ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. यासोबतच नोराने भारतीय पुरुषांच्या वागणुकीवरही प्रकाश टाकला आहे.

जाणून घेऊया काय म्हणाली अभिनेत्री

अलीकडे, एका चॅट शोमध्ये अभिनेत्रीने टिप्पणी केली की भारतीय पुरुष काही बाबींमध्ये मध्य पूर्व आणि आफ्रिकन पुरुषांसारखे असतात. जर कोणी युरोपमधील असेल तर त्याचा दृष्टीकोन वेगळा असेल. भारतीय पुरुषांबद्दल बोलताना नोरा म्हणाली, ‘तुम्ही लोक अगदी मध्य पूर्व आणि आफ्रिकन लोकांसारखे आहात. खरे सांगायचे तर, यात काही फरक नाही

अभिनेत्री नोरा फतेहीची एका मुलाखतीची खूप चर्चा होत आहे . या मुलाखतीतून तिने बॉलिवूड जोड्यांवर निशाणा साधला आहे. इतकंच नव्हे तर या सेलिब्रिटी कपल्सबद्दल तिने धक्कादायक वक्तव्य केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक जोड्या या केवळ एकमेकांच्या प्रेमात असल्याचं दाखवतात, पण खऱ्या अर्थाने हे सगळं केवळ स्वत:च्या फायद्यासाठी करत असतात, असं तिने म्हटलंय. हे सेलिब्रिटी त्यांचं खासगी आयुष्य आणि काम यांचं मिश्रण करतात आणि त्यामुळेच ते नैराश्यात येतात किंवा आत्महत्येसारखे विचार त्यांच्या डोक्यात येतात, असंही नोरा म्हणाली.

सेलिब्रिटी जोडप्यांवर साधला निशाणा

रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये नोरा म्हणाली, “त्यांना फक्त तुमच्या प्रसिद्धीचा त्यांना स्वत:साठी वापर करून घ्यायचा असतो. ते माझ्यासोबत असं काही करू शकत नाही. म्हणून तुम्हाला मी अशा कोणत्याही व्यक्तीमागे धावताना किंवा डेटिंग करताना दिसत नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोक केवळ प्रसिद्धीसाठी लग्न करतात. हे लोक त्यांच्या पत्नीचा किंवा पतीचा वापर नेटवर्किंग, ओळख वाढवण्यासाठी, पैशांसाठी किंवा नाव जोडण्यासाठी करतात. ते असा विचार करतात की, अमुक एका व्यक्तीशी मला लग्न करायचं आहे, जेणेकरून मी त्याच्याशी पुढील तीन वर्षे जोडली जाऊ शकते. त्याचे काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत आणि ते बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. त्यामुळे मला त्या लाटेवर स्वार व्हायचंय. इतकं मोजमाप करून विचार करणारे हे लोक आहेत.

सेलिब्रिटींवर टीका

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींवर टीका करत नोरा पुढे म्हणाली, “हे सर्व पैसा आणि प्रसिद्धीच्या भुकेपोटी होतं. अशा मुली किंवा मुलं त्यांचं संपूर्ण आयुष्य पैसा, प्रसिद्धी आणि पॉवरसाठी उद्ध्वस्त करायला तयार असतात. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेमसुद्धा करत नाहीत, अशा व्यक्तीशी लग्न करून वर्षानुवर्षे सोबत राहण्याइतकी वाईट गोष्ट कोणतीच नाही. आपल्या इंडस्ट्रीत असं अनेकजण करत आहेत. त्यांना फक्त इंडस्ट्रीतल्या एका विशिष्ट गटात टिकून राहायचंय, म्हणून ते सर्व करत आहेत. आपल्या करिअरचं काय होणार, हेच त्यांना माहित नसल्याने प्लॅन अ, प्लॅन ब असे त्यांचे प्लॅन्स तयार आहेत. आपलं खासगी आयुष्य, मानसिक आरोग्य आणि आनंद यांचा त्याग करण्यामागचं कारणच मला समजत नाही. कारण काम हे काम असतं. आपलं घर, खासगी आयुष्य हे सर्वस्वी वेगळं आहे. या दोन्ही गोष्टींचं मिश्रण तुम्ही करू शकत नाही. असं केल्यास तुम्ही कधीच खुश राहू शकणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top