24×7 Marathi

भाजपचा जाहीरनामा

भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात गरिबांना पुढील ५ वर्षे मोफत धान्य मिळणार आहे. जेनरीक औषधी ८० टक्के स्वस्त देण्यात येणार आहे, ही आश्वासने आहे. तसेच ७० वर्षांवरील लोकांसाठी भाजपने मोठी घोषणा केली आहे. ७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेत घेणार आहे. प्रत्येकाला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहे. गरिबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधण्याची योजना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितले

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहील, अशी मोदींची गँरटी आहे. गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे असेल याची आम्ही काम करणार आहे. इको टुरिझमसाठी नवी केंद्र सुरु करणार आहेत. 5G चा विस्तार करण्यात येणार असून 6G वर काम सुरु केले जाणार आहे. सरकारच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करण्यात येत आहे. टेलिमेडिसिनचा विस्तार केला जात आहे.

जनतेकडून मागवल्या होत्या सूचना

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्याला ‘मोदी की गारंटी’ हे नाव देण्यात दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जानेवारी 2024 रोजी निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या.त्यात 15 लाखांपेक्षा जास्त सूचना होत्या.

काय आहेत महत्वाच्या घोषणा

• पुढील पाच वर्षे गरीबांना मोफत धान्य
• आणखी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार
• गरिबांसाठी तीन कोटी घरे बांधणार
• ७० वर्षांवरील लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ
• तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ
• घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहचवणार
• मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यंत वाढवणार
• ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार
• महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार
• कोट्यवधी लोकांची वीजबिल शून्य करणार
• पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल
• 5G चा विस्तार करण्यात येणार असून 6G वर काम सुरु

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top