सध्या गोंधळाची स्थिती
सिडनीमध्ये एका मॉलमध्ये आतंकी हल्ला झाला आहे, ज्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने माहितीनुसार, एका शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार आणि चाकूने हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्लेची पुष्टी केली आहे आणि मॉलमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांच्या निर्देशानुसार, मॉलमधून हजारो लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे आणि जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
न्यू साऊथ वेल्स राज्याच्या पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेराव टाकलाय आणि इमर्जन्सी सेवा क्षेत्रात उपस्थित आहेत. दोन हल्लेखोर होते, त्यात एकाला जागेवरच मारले आणि दुसऱ्याचा शोध घेत आहेत.