Maharashtra Board 12th Results 2024:
MSBSHSE Class 12th Results 2024 Date Time Declared: राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. राज्य मंडळाने जाहीर केल्यानुसार उद्या म्हणजेच २१ मेला बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा राज्यातून परीक्षेसाठी तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी जाहीर केला होता.
यंदा गेल्यावर्षीपेक्षाही लवकर निकाल जाहीर करण्याची तयारी असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली होतीच. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून ऑनलाईन अशीही चर्चा रंगली होती की आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा व शेवटचा टप्पा पार पडताच निकाल जाहीर केला जाईल परंतु आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने या चर्चांची पुष्टी करण्यात आली आहे.
निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
१. सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
२. यानंतर होमपेजवरील Maharashtra HSC result साठी लिंकवर क्लिक करा.
३. आता तुमचा सीट नंबरआणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
४. यानंतर Maharashtra board 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
५. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा
https://mahresult.nic.in/
मिळलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाच्या घोषणेनंतर, बोर्ड विज्ञान, कला आणि वाणिज्य यासह विविध शाखांमधील परीक्षेतील टॉपर्सची घोषणा करणार नाही असे समजतेय. विद्यार्थ्यांमधील नकारात्मक स्पर्धा टाळण्यासाठी बोर्डाकडून मागे असा निर्णय घेण्यात आला आहे.
१२ वी च्या विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत कधी मिळणार?
गेल्या वर्षी, १२ वीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाल्यावर ५ जूननंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निकालाची प्रत उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे यंदा सुद्धा निकालाच्या तारखेनंतर साधारण १० दिवसात विद्यार्थी त्यांच्या संबंधित कॉलेजमध्ये भेट देऊन निकालाची प्रत मिळण्याबाबत चौकशी करू शकतात. याशिवाय बोर्डाकडून निकाल जाहीर करताना सुद्धा याविषयी माहिती देण्यात येते.
बारावीच्या निकालानंतर ATKT परीक्षा कधी द्यावी लागेल?
गेल्या वर्षी तब्बल ३३,३०६ विद्यार्थ्यांना ATKT परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली होती. ही परीक्षा दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात तात्पुरते प्रवेश घेण्याची परवानगी देते मात्र पुढे जाण्याआधी त्यांना हे विषय उत्तीर्ण व्हावे लागतात. साधारण ऑक्टोबरमध्ये एटीकेटीच्या परीक्षा होतात. महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या निकषांना जे विद्यार्थी पूर्ण करत नाहीत त्यांना ही परीक्षा द्यावी लागते. आपल्या माहितीसाठी या निकषांमध्ये एकच नियम आहे तो म्हणजे थेअरी व प्रात्यक्षिक परीक्षा मिळून विद्यार्थ्याने ३५ टक्के गुण मिळवलेले असायला हवेत.